Baramati Divyang Cricket Camp (28 Feb to 2 Mar 2023)

Baramati Divyang Cricket Camp (28 Feb to 2 Mar 2023)

“सन 2023-24 च्या दिव्यांग क्रिकेटचे होणाऱ्या सामन्यांकरीता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर दि डिसेबल्ड यांनी नवीन दिव्यांग खेळाडूंना संधी मिळावी या प्रमुख उद्देशाने दिनांक 28 फेब्रुवारी ते 02 मार्च, 2023 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम, बारामती येथे दिव्यांग क्रिकेट खेळाडूंच्या संघाकरीता निवड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्धाटन मा. श्री. रोहीतदादा पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ दिनांक 28 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.
सदर शिबिरास आपापल्या जिल्ह्यातील इच्छुक दिव्यांग क्रिकेट खेळाडूंना उपस्थित राहणेसाठी कळवावे. सहभाग घेवू इच्छिणाऱ्या खेळाडूंनी www.mcadpune.org या संकेतस्थळास भेट देवून माहिती फॉर्म दिनांक 26 फेब्रुवारी, 2023 पर्यंत भरावा. तसेच आधार कार्ड, Unique Disability ID कार्ड, दोन फोटो, बँक खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, इ. सोबत आणावेत. अधिक माहितीकरिता श्री. विजय गायकवाड (8530502713) व श्री. रविंद्र जगदाळे (9766231683) यांच्याशी संपर्क साधावा.“

6 Comments

Post A Comment